पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/213

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लॉसेन परिषद् (७) ग्रीस, तुर्कस्थान व बल्गेरिया यांच्या हद्दी परस्परांच्या मुलखाशी जेथे भिडत तो इदे लैन्यविहीन झाला. (८) आशिया खंडांत आशियामायनरमध्ये तुकचा तीन लाख चौरस मैलांचा सलग एकधर्म मुलुख बनला (९) तुर्कस्थानचे कर्ज कमी करण्यांत आले. दोस्त राष्ट्रांश सुलतानानी सेव्हर्सचा तह करून तुर्की राष्ट्राच्या नरडीस नख लावले तर कमालपाशांच्या पक्षाने लॉसेनचा तह करण्यास दोस्त राष्ट्रांस भाग पाडून तुर्की राष्ट्र जीवंत ठेवले, असे प्रत्येक समंजस माणसास कबूल करावे लागेल. या परिषदेत अपेक्षेबाहेर तुर्कस्थानास यश मिळाले याचे मुख्य कारण म्हणजे कमालपाशांचा विलक्षण दरारा हेच होय. तुकची मजबूत संघटना व त्या संघटनेस मिळालेले कमालपाशांचे नेतृत्व यामुळे तुर्कस्थानच्या मागण्या फेटाळून लावण्याची दोस्तराष्ट्रांची छाती झाली नाही. सेनची शांतता परिषद यशस्वी रीतीने पार पडली व विजयी मुद्रेनं तु शिष्टमंडळ अगोरास परतले. या परिषदेमुळे युरोपांत माजलेले अंतस्थ कलह एकदां कायमचे मिटले व सगळीकडे शांतता प्रस्थापित झाल्याचे जाहीर करण्यांत आले.


११५