पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/210

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मन

=

  • } गाझी काहपाशा

तासाचा अवधी आहे, इतके बोलून लॉर्ड कर्झन झणकान्याने निघून गेले. इस्मतपाशाही उठले व आपल्या निवासस्थानी गेले. ताबडतोब फ्रेंच शिष्टमंडळाचा त्यांच्या भोवती गराडा पडला. * कांहीं झाले तरी लॉर्ड कर्झन यांचे म्हणणे मान्य करणे हे सर्वांच्या हिताचे आहे. ही परिषद यशस्वी झाली नाही तर पुन्हां दुसरे महायुद्ध दत्त म्हणून उभे राहील आणि त्या महायुद्धात सर्वांची आहुति पडेल. ही परिषद यशस्वी करणे सर्वस्वी आपल्या हात आहे. अद्याप गाडी सुटावयास वेळ आहे. तेवढ्यात आपण आपला अनुकूल निणय द्याल तर पुन्हा परिषदेचे काय सुरू होईल, अशी विनवणी फ्रेंच मुत्सद्यांनी केली; पण इस्मतपाशांच्या चेहरयावर कांहींच फरक दिसेना. विनवणीचा काही उपरोग होत नाही असे पाहून इस्मत पाशांची प्रशंसा करण्याचा प्रयत्न त्यांनी केला; पण तोही वाया गेला. १६ माझ्या राष्ट्राच्या इज्जताला धक्का लागेल अ एकहा कृत्य मी करणार नाही ' निश्चितपणे इस्मतपाशांनी उत्तर दिले. बिचारे फ्रेंच मुत्सद्दी निराश होऊन येरझाया घालू लागले. इकडे स्टेशनच्या फ्लटफार्मवर लॉर्ड कर्झन साहेबांची स्वारी हातांत घड्याळ घेऊन उभी होती. गाडी सुटावयास १५ मिनिटे राहिली, १० मिनिटे राहिली, ५ मिनिटे राहिली तरी इस्मताशांचा पत्ता नाही. त्यांना वाटले की आपल्या धमकावणीला भिऊन हा १९३