पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/209

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लाँसिन परिषद् असेल तरच आपण वादविवादांत भाग घेऊ,' असे इस्मतपाशांनी स्पष्टपणे बजावले. सर्वानी संमत्ती दिल्यावर वादविवादास सुरवात झाली. परिषदेंत वातावरण गरम करणारे प्रसंग उपस्थित होऊ लागले; विशेषतः लॉर्ड कर्झन यांच्याशी तर इस्मतपाशांचे सारखे खटके उडू लागले. शेवटी असेच खटके उडत राहतील तर शांतता परिषदेचा बोजवारा उडेल व पुन्हा एकाद्या युद्धास तोंड लागेल या भीतीनें लॉर्ड कर्झन सोडून इतर मुत्सद्यांनी नरमाईचे घोरण स्वीकारले. | या परिषदेत तुर्की शिष्टमंडळातर्फे इस्मत इनून यांनी अतिशय मुत्सद्देगिरीने व धीमेपणाने काम चालविले. दोस्तराष्ट्रांची भीडभाड न राखत किंवा त्यांच्या धमकावणीस न जुमानता आपल्या राष्ट्राची बाजू त्यांनी उत्कृष्टपणे मांडली. लॉर्ड कर्झन व इस्मतपाशा यामध्ये वादविवाद चालला असतां लॉर्ड ईन एकदम गरम झाले व इस्मतपाशांना म्हणाले, “ तुम्ही जर आमचे म्हणणे मान्य केले नाही तर मी निघून जाईन." | 4 आपण जरी निघून गेलात तर त्याची जबाबदारी आपल्या शिरावरच राहील, इस्मतपाशा शांतपणे म्हणाले. 4 आतां ( वाजले आहेत. आणखी एका तासाने म्हणजे ९ वाजतां गाडी सुटते, तेव्हां आपणांस विचार करावयास एक ११९