पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाझी कमालपाशी झालेल्या बायझंटाईन राज्याबरोबर जोराची टक्कर दिली. यशोदेवतेने तुकीच्या गळ्यांत माळ घातली आणि बायझंटाईन राज्याच्या पायावर तुर्की साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. | तुर्की साम्राज्याच्या संस्थापकाचे नांव उस्मान. यांचा जन्म १२९८ मध्ये झाला. आशियामायनरमध्ये अल्लाउद्दीन नांवाचा राजा एक छोटेसे राज्य चालवीत होता. अल्लाउद्दीन राजाच्या पदरीं उस्मान हे एक सरदार होते. अल्लाउद्दीनच्या मरणानंतर उस्मान स्वतंत्र झाले व त्यांनी आपल्या सैनिकांनीशी बायझंटाईन राज्याचे लचके तोडण्यास सुरवात केली. अडतीस वर्षांच्या अवधींत काळासमुद्र व बास्फरससामुद्रधुनीच्या जवळचा प्रदेश पादाक्रांत करून त्यांनी तुर्की राज्याची प्राणप्रतिष्ठा केली. त्यांच्या राज्यांत खिश्चन लोकांचा भरणा होता. त्यांच्या धर्मभावना न दुखावतां उस्मान यांनी अतिशय न्यायीपणाने राज्य केले. उस्मान यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव आरखान हे गादीवर आले. त्यावेळी आरखान यांचे वय बेचाळीस वर्षांचे होते. यापुढे त्यांनी बत्तीस वर्षे राज्यसुख भोगले, आरखान यांनी आपली राजधानी ब्रुसा येथे नेली. आपल्या वडिलाप्रमाणे त्यांनी बराचसा ग्रीक प्रांत आपल्या मुलखास जोडला. कॅान्स्टॅटिनोपल येथील ग्रीक बादशहाच्या थोरल्या मेहुणीशी त्यांनी लग्न लावले. आरखान यांना वयाच्या क्होत्तराव्या वर्षी १३५८ मध्ये मृत्यू आला.