पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/204

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गा। माता थोड्याच दिवसांनीं सुलतानांनी आपला एक विश्वासू मनुष्य कर्नल हेरिंग्टनकडे पाठविला. तो विश्वासू मनुष्य अत्यंत गुप्तपणे इंग्लीश सैन्याच्या छावणीत आला व त्याने कर्नल हरिंग्टनची मुलाखत घेतली. आपला जीव धोक्यांत असून इंग्रजसरकारचे आपणांस संरक्षण मिळावे अशी सुलतानांनीं विनंती केली आहे, असे त्याने कर्नल हरिंग्टनला सांगितले. दोन दिवसांनी पहाटेच्या वेळी एक मोटारगाडी राजवाड्याच्या मागील दरवाज्यापाशी उभी राहिली. सुलतान वहीदुद्दीन आपल्या मुलासह राजवाड्याबाहेर आले. त्यांच्याबरोबर एक नोकर असून त्या नोकराच्या हातांत एक थैली होती. त्या मोटारींत सुलतान, त्यांचा मुलगा व तो नोकर बसल्याबरोबर मोटार भरधांव निघाली. ती मोटार सदुद्र किना-याजवळ जाऊन थांबली व एका लहानशा मोटारबोटीमधून सुलतान व त्यांच्या परिवाराम इंग्रजांच्या लढाऊ बोटीवर नेण्यात आले. एका तासानंतर लढाऊ बोट हालली व सुलतानांनीं तुर्कस्थानचा कायमचा निरोप घेतला. त्यांचे पुतणे अबदुलमजीद यांना खलीफा करण्यांत आले; पण या नव्या खलीफाना अधिकार किंवा सत्ता अशी कांहीच नव्हती,

-

- = -..." १८६