पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/205

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

. ..। प्रकरण २४ दें प्रकरण । - - लॉसन घट कमालपाशांचा सुलतानपद नष्ट करण्याचा बेत सिद्धीस गेला; पण तो किती प्रयासाने, किती मुष्कीलीने ! यापेक्षाही महत्वाचे बेत कमालपाशांना पार पाडावयाचे होते. तुर्की जनता पुराणमतवादी असल्याकारणाने कमालपाशांच्या प्रत्येक कृतीस ती संमत्ती देईलच. अशी खात्री नव्हती. तुर्कस्थानांत प्रजासत्ताक राज्य प्रस्थापित करावयाचें कमालपाशांचे ध्येय होते. जनता सोडून द्या; पण असेंब्लीचे सभासद देखील तितक्याशा पुढारलेल्या मताचे नव्हते. अशा परिस्थितीत प्रजासत्ताक राज्याचा ठराव असेंब्लीत आणला तर तो फेटाळला जाईल, अशी त्यांना खात्री वाटत होती. कुठल्याही गोष्टीची संथपणे तयारी करीत राहणे व वेळ आल्याबरोबर ती गोष्ट पार पाडून दाखविणे हा कमालपाशांचा स्वभाव होता. आपल्या मनांत आले की परिस्थितीचा विचार म -7