पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/202

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाझी कमालपाशा -- या महत्वाच्या प्रश्नाचा विचार करण्याकरिता कायदा कमेटीची बैठक भरली. या कमेटींत कायदेपंडित व धर्मपंडित यांचा समावेश करण्यांत आला होता. या कमेटीचे अध्यक्षस्थान एका जाड्या धर्मपंडितांना देण्यात आले होते. कमेटीमध्यें खूप जोराचा व कडाक्याचा वादविवाद सुरू झाला. एका बाजूला कायदेपाडत व दुस-या बाजूला धर्मपंडीत यामध्ये खडाजंगी सुरू झाली. धर्मग्रंथांतील उतारे, जुन्या कागदपत्रांतील दाखले, बगदाद व कैरो येथील जुना इतिहास या सर्वांचा समाचार घेण्यांत येत होता. वाक्यांचा व शब्दांचा कीस निघू लागला. कमालपाशा हा सर्व प्रकार पहात एका कोपच्यांत बसले होते. शेवटीं मुख्य प्रश्नाची वासात होण्याची चिन्हें दिसेनात. कमालपाशा. ताडकन उभे राहिले व म्हणाले, ' सदगृहस्थहो, सुलतानपद व खिलपत यांची फारकत करण्याच्या प्रश्नावर जो तुमच्छ वादविवाद चालला आहे, त्यावरून हा प्रश्न तुमच्या हातून समाधानकारक सुटेल असे वाटत नाही. तुम्हीं आतापर्यंतची परिस्थती नीट लक्ष्यांत आणा. सुलतांनानीं जी सर्व सत्ता लोकांच्या हातून जबरदस्तीने छिनावून घेतली होती, ती सत्ता लोकांनी पुन्हा आपल्या सामर्थ्यावर परत मिळविली आहे. ती सत्ता पुन्हा सुलतांनास बहाल करण्याचे काहीच कारण नाहीं. सत्ता असलेले सुलतानपद हे खिलापतीपासून अलग झालेच