पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/201

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

राजकारण व धर्म यांची फारकत बादशहा म्हणविणाच्या सुलतानान किंवा त्यांच्या मंत्रीमंडळाने काय परिश्रम केले आहेत? तुर्कस्थानातर्फे आमंत्रण स्वीकारावयाचा या सुलतानांस काय हक्क आहे ? सुलतानांचे मंत्रीमंडळ म्हणजे अव्वलदर्जाचे देशद्रोही लोक आहेत. तुर्कस्थानमध्ये राज्य करणारे एकच खरे सरकार आहे आणि ते म्हणजे ग्रँड नॅशनल असेंब्ली होय. ' | | * आपल्या राष्ट्रास परकीयांना विकणारा देशद्रोही म्हणून सुलतानांचा प्रत्येकजण तिरस्कार करू लागला 'x कमालपाशांना चांगली सुसंधी मिळाली. सुलतानांना पदच्युत करावयाचा त्यांना सुंदर मोका मिळाला. असेंब्लीमधील वातावरण सुलतांनाविरुद्ध अगोदरच गरम झाले होते. अशावेळी कमालपाशांनी सुलतानपद व खिलाएत निरनिराळी करून या सुलतानांना बडतर्फ करावे असे सुचविले. लगेच तो प्रश्न खास कायदा कमेटीकडे शिफारशीकरितां पाठविण्यात आला.. x “ Glimpses of World History '" bg Jawaharlal Neharu. Page 705 १८..