पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अतातुर्क गाझी कमालपाशा उपोद्घात । -- | गाझी कमालपाशासारख्या अद्वितीय महापुरुषास जन्म द्यावयाचे भाग्य ज्या देशास लाभले, त्या देशाचे नांव तुर्कस्थान. युरोप व आशिया या दोन खंडांच्या सरहद्दीवर तुर्कस्थान वसलेला आहे; किंबहुना युरोप व आशिया या दोन खंडांमध्ये तुर्कस्थान विभागला गेला आहे असे म्हटल्यास ते अधिक सयुक्तिक दिसेल. तुर्कस्थान हा विख्यात बायझंटाईन राज्याचा महत्वाचा प्रदेश होय. पराक्रमी तुर्कीनी सदर प्रदेश पादाक्रांत करून त्यावर आपली कायमची सत्ता प्रस्थापित केली. | तुर्कीचे मूळ वसतिस्थान म्हणजे मध्य आशिया होय; पण तुर्कोच्या लढाऊवृत्तीला व पराक्रमाला मध्य आशियाच्या चतु:- सीमा अपु-या पडू लागल्या. आजुबाजूचा प्रदेश काबीज करीत तुर्कोनी आशियामायनांत पदार्पण केले व एकेकाळीं जगविख्यात