पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/198

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण २३ वें - -- राजकारण व धर्म यांची फारकत >> • कमालपाशांचा या पुढील जीवन वृत्तांत पाहिला म्हणजे आयुष्यभर झगडा करणे हे त्यांचे ध्येय असले पाहीजे हे उघड दिसते आणि ते त्यांनी आपल्या एका स्नेह्याजवळ बोलूनही पण दाखविलें. तो स्नेही म्हणाला, “ तुम्हीं ग्रीक लोकांचा पराभव केलात. इंग्लीश, इटालीयन व फ्रेंच राष्ट्रांवर मात केलीत. तुम्ही आतांपर्यत झगडतच आलांत; यापुढे तुम्हांला विश्रांती घ्यावयास हरकत नाहीं.

  • विश्रांती ! कसली विश्रांती ! ग्रीक लोकांबरोबर झगडा संपला म्हणून आपला कार्यभाग संपला असे समजू नका, आतां मला स्वजनांबरोबर झगडावे लागेल, येथील राजवटी विरुद्ध झगडावे लागेल, माझ्या राष्ट्रांतील लोकांच्या भावना निःसत्व करून टाकणान्या सामाजिक चालिरिती विरुद्ध झगडावे लागेल ! माझे