पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/199

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

राजकारण व धर्म यांची कारकत राष्ट्र, माझा देश सत्वशील, बलवान व सुखी होईपर्यंत मला झगडावे लागेल. अन्यायाविरुद्ध, असत्याविरुद्ध आयुष्यभर झगडा करीत राहणे हेच माझ्या आयुष्याचे ध्येय आहे. " परकीयांचे उच्चाटण केल्यानंतर कमालपाशांनी सध्यांच्या राज्यपद्धती विरुद्ध झगडा करण्याचे ठरविले. अंगोरामध्ये नॅशनल अँड असेंब्लीच्या हाती खरी राज्यसत्ता होती; पण कॉन्स्टॅटिनोपलमध्ये नांवाला का होईना सुलतान व त्यांची प्रभावळ होतीच. तुर्कस्थानामधील सर्वसाधारण जनता जुन्या विचाराची असल्यामुळे सुलतानांना तुर्कस्थानचा राजा म्हणून समजावे व कमालपाशांनी त्यांचा मुख्य प्रधान म्हणून राहावे अशी तिची इच्छा होती. पण कमालपाशांची, एका सत्ताधारी राजाचा मुख्य प्रधान होण्याची इच्छा नव्हती. त्यांच्या कल्पना पुरोगामी व क्रांतिकारक होत्या. सुलतानशाही उखडून टाकून लोकशाही प्रस्थापित करण्याची त्यांची इच्छा, नव्हे महत्वाकांक्षा होती. पण हे शक्य कसे व्हावे ? जनता इतक्या पुढारलेल्या विचाराची नसल्यामुळे तिच्या प्रकृतीला लोकसत्ताक राज्याची कल्पना कितपत मानवेल याची कमालपाशांना शंका होती; म्हणून कमालपाशांनी या प्रकरणांत धीरे धीरे हात घालण्याचे थोजिलें. १८१