पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/197

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रशंसनीय तारतम्य ख्रिश्चन राष्ट्रांविरुद्ध चढाई करावी किंवा गुलाम राष्ट्रांचे नेते बनून त्यांच्यावर प्रभुत्व गाजविणाच्या राष्ट्रांशी झगडा चालवावा, अशा रम्य पण आचरण्यास कठीण कल्पनांच्या आहारी कमालपाशा कधीच गेले नाहीत. आकाशाला गवसणी घालण्याचे विचार किंवा केवळ मोठेपणा मिळविण्याकरितां घोषित केलेले अशक्य ध्येय यांच्या मागे लागून आपल्या स्वीकृत कार्याकडे दुर्लक्ष्य करण्याचे पाप कमालपाशांनी कधींहि केलं नाही. त्यांचे प्रशंसनीय तारतम्य मी मी म्हणणाच्या मुत्सद्यांना देखील चकित करून सोडणारे आहे असा निर्वाळा प्रत्येक बुद्धिवादी माणसास द्यावा लागेल,


--- १७५