पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/194

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाझी भालपाशा सणसणीत थप्पड देऊन त्यांचा नक्षा उतरविणारा हा मुसलमान नरवीर आपला आदर्श आहे असे गोच्या राष्ट्रांच्या टाचेखाली जीवित कंठणाच्या गुलाम नागरिकांना वाटू लागले. आतापर्यंत पाश्चात्यांनी आपल्यावर कुरघोडी केली; आतां त्यांच्यावर आम्ही मात करू अशा आशेने आशियाखंडांतील राष्ट्रांकडून, युरोपियन राष्ट्रांविरुद्ध कमालपाशांनी आपलें पुढारीपणः स्वीकारावे, अशी इच्छा प्रदर्शित करण्यांत आली. पण या प्रशंसेनें, अभिनंदनाने किंवा मोठेपणाने कमालपाशनि आपल्या मनाचा तोल जावू दिला नाही. त्यांनी आपले डोके स्थिर ठेविले. बेफाट कल्पनांनीं हुरळून न जाता, त्यांनी ज्ञात चित्ताने आपले ध्येय, आपले कार्य ठरविले. साम्राज्य स्थापपंथाच्या किंवा पाश्चात राष्ट्रांविरुद्ध पौर्वात्य राष्ट्रांचे पुढारीपण स्वीकारण्याच्या कल्पना त्यांना अव्यवहार्य व कुचकामाच्या वाढू लागल्या. जगातील सर्व मुसलमानांचे नेतृत्व स्वीकारण्याचे विचारही त्यांना अप्रबुद्धपणाचे वाटू लागले. एका प्रसंगी त्यांनी स्पष्टपण सांगितले कीं, ६ जगांतील माझ्या सर्व मुसलमान बंधूनी स्वतंत्र राहावे अशी माझी इच्छा आहे. एवढी सदिच्छा प्रदर्शित करण्याखेरीज आपण त्यांना कांहीही मदत करू शकत नाही. आपल्या राष्ट्राकडे संपूर्ण दुर्लक्ष करून, इतर राष्ट्रांतील मुसलमानांच्या १७६ 1