पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/193

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

-:: : । । ।।। । प्रकरण २३ ३ । - -xx प्रशंसनीय तारतम्य


- -- युरोपांतील बलाढ्य राष्ट्रांच्या आक्रमणापासून आपझ्या लहानशा राष्ट्रास वाचविल्याबद्दल, कमालपाशांचा जयघोष अद्यापही चालला होता. जगांतील प्रत्येक राष्ट्राच्या मुखपत्रांनी कमालपाशांची मुक्तकंठाने स्तुति चालविली होती. आफ्रिका, मलाया स्टेटस्, रशिया, अफगाणिस्थान, पर्शिया, चीन, इतकेंच नव्हे तर, हंगेरीसारख्या खिश्चन राष्ट्रांकडून कमालपाशांना मानाच्या तलवारी नजर करण्यांत आल्या; मानपत्रे देण्यात आली. कित्येक वर्षांत कुणाचाही जयजयकार झाला नसेल इतका जयजयकार कमालपाशांचा सर्व जगभर झाला. गुलाम राष्ट्रे कमालपाशांकडे आशाळभूत नजरेने पाहू लागली; ज्यांना साम्राज्यशाहीबद्दल तिटकारा वाटत होता ते लोक कमालपाशांकडे आपला पुरस्कर्ता निर्माण झाला अशा भावनेने बभू लागले. अखिल युरोपांमधील गोच्या राष्ट्रांना