पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/195

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रय तास्तम्य उद्धाराकरितां किंवा स्वातंत्र्याकरिता आपले सर्व लक्ष, सर्व शक्ति केंद्रीभूत करणे त्यांना अप्रयोजकपणाचे वाटले. मुसलमान राष्ट्रांनी दुसन्या राष्ट्राच्या मदतीची अपेक्षा न करतां, स्वत:च्या हिंमतीवर व सामर्थ्यावर तुर्कस्थानाप्रमाणे स्वातंत्र्य मिळवावे अशीच कमालपाशांची इच्छा होती. बाहेरून मदतीची अपेक्षा करीत बसण्यापेक्षा आपणच स्वावलंबी होऊन आपला मातृदेश, आपले राष्ट्र, मुसलमानानी स्वतंत्र व स्वयंशासित करावे हीच कमालपाशांची शिकवण होती. माझ्या मदतीची अपेक्षा करण्यापेक्षां तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहण्यास शिका,' असाच कमालपाशांचा सर्व मुसलमानी राष्ट्रांना संदेश होता, जगाच्या भानगडी किंवा उचापती न करतां, प्रत्येकाने प्रथम आपआपल्या राष्ट्राचा उद्धार करण्याचे व्रत स्वीकारावे, हैं। कमालपाशानी अश्या उदाहरणाने शिकावले. . आणि आपले हे विचार त्यांनी ग्रँड नॅशनल असेंब्लीपुढे स्पष्टपणे मांडले. ते म्हणाले, * सर्व मुसलमान राष्ट्रांचा एक संध । बनवावा, या गोष्टीवर माझा विश्वास नाही. प्रत्येकाने आपले राष्ट्र सुसंघटीत व बलवान करण्याचा प्रयत्न करावा. राष्ट्र म्हणून आपणाला आपल्या सरहद्दीत अभिमानाने कसे जगतां येईल एवढा एकच विचार आपल्या डोळ्यांसमोर ठेवला पाहिजे. आपण । १३ |