Jump to content

पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/192

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गा। कालपाशी कमालपाशांचे लग्न झाले याची शहरांत बातमी देखील नव्हती. ज्यावेळी संध्याकाळी ते लतीफा खानमसह गाडीतून शहरांत फिरावयास निघाले त्यावेळी लोकांनी ओळखिले की कमालपाशा चतुर्भुज झाले. हां हां म्हणतां ही बातमी शहरभर पसरली. आपल्या स्वातंत्र्यवीराचा विवाह झाला याबद्दल शहरांतील लोकांनी त्यादिवशी आनंदोत्सव केला. ३७४