पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/191

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रमपोशांत दुसरे दिवशी ते आपल्या लष्करी ठाण्याकडे परतले. जवळ जवळ महिनाभर ते आपल्या कामांत गढून गेले होते. काम संपल्यानंतर, ते मोटारींतून निघाले ते तडक स्मनमध्ये लतीफा खानमच्या घरी पोहोचले. लतीफा वरच्या मजल्यावर आहे असे कळतांच ते । धावतच जिना चढून वर गेले. कमालपाशांना पाहिल्या बरोबर लतीफा खानमनी स्मित हास्य केले. ६६ लतीफा, तुझी इच्छा मला मान्य केलीच पाहिजे. मी लग्न करावयास तयार आहे. आत्तां; या घटकेला; क्षणाचाही विलंब न लावतां. | लतीफा गोंधळून गेल्या; लाजल्या. त्यांना काय उत्तर द्यावे तेच कळेना. शेवटी त्या कशाबशा म्हणाल्या, “ इतकी काय गडबड आहे; उद्या सकाळी सकाळपर्यंत दम धरणे कमालपाशांच्या जिवावर आहे. शेवटी कसेबसे ते तयार झाले. सकाळी उठल्याबरोबर कमालपाशांनी रस्त्यांतच एका मुलाला अडविले. तो बिचारा मशिदीतील प्रार्थना आटोपून आपल्या घरी जात होता. कमालपाशांचे व लतीफा खानमचे लग्न लावल्यानंतर त्या मुलाची सुटका झाली. कांहीही अनावश्यक विधी न करता किंवा कुणासही आमंत्रण न देतां कमालपाशांनी आपले लग्न आटोपून घेतले. १७३