पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/190

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

16। कमलपाशा वा-याच्या झोताबरोबर समोरील बागेतील गुलाबाचा सुगंध सगळीकडे दरवळत होता. कमालपाशांनी लतीफा खानमना प्रेमभराने झटदिशी आपल्या जवळ ओढून घेतले. लतीफा खानम चटकन बाजूला झाल्या व म्हणाल्या, १६ माझे तुमच्यावर प्रेम आहे; पण लग्न झाल्याखेरीज मी तुमच्याजवळ येऊ शकत नाहीं याबद्दल क्षमा करा."

  • काय लग्न? पण तुर्कस्थानाचे कार्य परिपूर्ण झाश्याखेरीज मी लग्न करणार नाही अशी शपथ घेतली आहे.'
  • मी ही पण शपथ घेतली आहे की लग्न झाल्याखेरीज माझ्या अंगाला कुणालाही स्पर्श करू देणार नाहीं "

लतीफा खानमच्या चेह-यावर करारीपणा स्पष्टपणे उमटला होता. कमालपाशा तिच्याकडे अनिमिष लोचनांनी पहात राहिले. ती बाजूला सरकली याबद्दल क्षणभर कमालपाशांना राग आला; पण तिचा करारीपणा व तत्वनिष्ठा पाहून, त्यांच्या मनांत एक प्रकारचा आदर उत्पन्न झाला. त्यांनी पुन्हा एकवार प्रेमभरान लतीफा खानमकडे पाहिले व आरश्या खोलीचा रस्ता सुधारला. १७२।