पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/189

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रेमपाशांत व त्याला लागून असलेला समुद्र याची शोभा अवर्णनीय दिसत असे. | त्या तरुण मुलीने कमालपाशांची चांगली बडदास्त ठेविली; त्यांना कुठल्याही गोष्टीचे न्यून वाटू दिले नाहीं. आरामशीर प्रासाद, आल्हादकारक हवा, रुचकर पक्वान्ने आणि त्या सुंदर मुलीचे सानिध्य यामुळे कमालपाशांचे दिवस अत्यंत आनंदांत व उल्हासांत जाऊ लागले. ती मुलगी सदैव आपल्या सानिध्यांत असावी असे त्यांना वाटू लागले. ती क्षणभर बाजूला गेली तर ते उदास बनत असत. एकदोन दिवसांतच त्या मुलीने कमालपाशांचे अंतःकरण काबीज करून टाकले. आतापर्यंत कमालपाशांच्या अंतःकरणावर कुणीही पगडा बसविला नव्हतानव्हे बसवावयाचे धाडस केले नव्हते. पण त्या हुषार मुलीने त्या पराक्रमी पुरुषास आपलेसे करून टाकले. कमालपाशांच्या अंतःकरणांत प्रेमाचा प्रादुर्भाव झाला. आतापर्यंत त्यांचे सबंध आयुष्य राष्ट्रसेवेत गेले होते. त्यांना प्रेम करावयास फुरसतच होती कुठे मुळीं ? पण आज ते प्रेमपाशांत सांपडले. जिच्या प्रेमपाशांत कमालपाशा बद्ध झाले त्या भाग्यशाली स्त्रीचे नांव लतीफा खानम, रात्रीच्या प्रशांतवेळी जेवण करून कमालपाशा लतीफा खानमसह गच्चीवर उभे होते. गार वारा वहात होता. त्या है १७१