पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/188

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाझी कमालपाशा कमालपाशांच्या नजरेशी आपली नजर भिडविली. इतक्या धीटपण वागणा-या त्या सुंदर तुर्की स्त्रीबद्दल कमालपाशांना एक प्रकारचे कौतुक वाटले. कमालपाशांनी त्या स्त्रीची आपुलकीने चौकशी केली. ती सुंदर स्त्री एका धनाढ्य तुर्काची एकुलती एक मुलगी होती. तिचा बाप अनेक जहाजांचा मालक होता. स्मनच्या एका बाजूस असलेल्या टेकडीवर तिचा प्रासादतुल्य महाल होता. ती नुकतीच परिसहून तुर्कस्थानास परत आली होती. कमालपाशांची कीर्ति अगोदरच तिच्या कानावर गेली होती. आपल्या राष्ट्रास स्वतंत्र करणाच्या स्वातंत्र्यवीरास आपल्या घरी पाहुणा म्हणून बोलावून, त्याचा सत्कार करावा या उद्देशानेच ती कमालपाशांकडे आली होती. तिने अत्यंत नम्रपणे आपल्या घरी राहावयाचे आमंत्रण कमालपाशांना दिले. सस्मितपणे कमालपाशांनी ते आमंत्रण स्वीकारले व त्याच दिवशी त्या स्त्रीच्या घरी ते पाहुणा म्हणून राहावयास गेले. जवळ जवळ वर्षभर त्यांना विश्रांती म्हणून कशी ती नव्हती. त्याठिकाणी त्यांना फार आराम वाटला. शिवाय तो प्रासाद शहरापासून दूर असल्यामुळे, त्याठिकाणी गडबड किंवा गलबला अजिबात नव्हता. त्या प्रासादाच्या गच्चीवरून स्मन शहर १७०