पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/187

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण १ दें । -XX प्रेमपाशांत 22 Ss | आपल्या निवासस्थानी कमालपाशा कामांत गर्क झाले असतां, पहारेक-यांनी एक स्त्री भेटावयास आल्याची त्यांना वर्दी दिली. पहारेक-यांची पाठ फिरते न फिरते तोच ती स्त्री कमालपाशा समोर दाखल देखील झाली. परवानगीशिवाय आपल्या खोलीत प्रवेश केल्याबद्दल कमालपाशांना राग आला; पण त्या सौजन्यपूर्ण स्त्रीकडे पाहिल्याबरोबर तो राग कोठच्याकोठे गेला. कमाल पाशांनी त्या स्त्रीस बसावयास सांगितले व नखशिखांत त्या स्त्रीस न्याहाळून पाहिले. त्याने पाश्चात्य पद्धतीचा वेष परिधान केला होता; नाहीं म्हणावयास तिने आपल्या डोक्यावरून तुर्की पद्धतीचे दस्त्र घेतले होते. अत्यंत आकर्षक चेहरा, काळेभोर डोळे, सतेज कांति यामुळे ती स्त्री अतिशय मोहक दिसत होती. तिच्या चेह-यावर एक प्रकारचा करारीपणा दिसत होता. तिने न डगमगत