पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/186

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गा। उपाशा ई त्यांच्या कृत्याची त्यांना आठवणही करूं न देतां कमालपाशा म्हणाले, 4 ते अधिकारी आहेत, माझे लष्करी प्रतिस्पर्धी आहेत. त्यांना मला आदराने वागविलेच पाहिजे " नंतर त्यांना जावयास कमालपाशांनी परवानगी दिली. जातांना कमालपाशा त्यांना म्हणाले, * किती झाले तरी युद्ध हा दैवाचा खेळ (Game of chance) आहे. तुम्ही आपल्याकडून शिकस्त केलीत. तुमचा पराभव झाला हा तुमच्या नशिबाचा दोष आहे; त्याबद्दल वाईट वाढू देऊ नका " कमालपानी आपल्या कट्टया दुष्मानांची मोठ्या इतमामाने रवानगी केली व आपण स्मनकडे कूच केले. कमालपाशामनास येणार म्हणून त्यांच्या स्वागताची प्रचंड तयारी झाली होती. लोकांना त्यांची फुलांनी मढविलेल्या मोटारीतून मोठ्या थाटाची मिरवणूक काढली. मिरवणूक पाहण्याकरितां लोकांची दुतर्फी प्रचंड गदा झाली होती कमालपाशांचे, त्यांच्या स्वातंत्र्यवीराचे दर्शन घेण्याकरितां लोकांचा नुसता तोबा उडाला होता. त्यांना पाहिल्या बरोबर कोकांनी कानठळ्या बसेपर्यंत जयघोष केला; परमेश्वरान त्यांना चिरायु करावे म्हणून करुणा भाकली. त्यांची गाडी जमावामधून जात असता, त्यांच्यावर फुले उधळली जात होता. मिरवणूक संपल्यानंतर कमालपाशा आपल्या निवासस्थानी गेले,