पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/182

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाची झमालपाशी आश्रय घेतला. ग्रीक सैन्यासमोरच खंदक खणून आपझ्या सैन्यास त्या ठिकाणी तळ देण्यास कमालपाशानी हुकूम दिला. कमालपाशांनी ग्रीक सैन्यास मागे हटविण्याचा अपूर्व पराक्रम केल्याबद्दल, अंगोरा मधील तुर्की जनता आनंदाने वेडी झाली. जनतेने कमालपाशांचा जयघोष सुरू केला आणि त्यांना ५ गाझा' ( शत्रूचा नाश करणारा ) अशी बहुमानाची पदवी दिली. परराष्ट्रांनीही कमालपाशांचा मुक्त कंठाने गौरव केला. रशिया, अफगाणिस्थान, हिंदुस्थान, आणि अमेरिका इतकेच नव्हे तर, थोड्याच दिवसापूर्वी तुर्कस्थानला आपला कट्टा शबू समजणाच्या फ्रान्स व इटली राष्ट्रांनाहीं, कमालपाशान' अभिनंदनपर तारा पाठविल्या. कमाउपाशांवर अभिनंदनाचा वर्षाव होत होता तरी त्यांचे सैन्याची पुनर्घटना करण्याचे कार्य दुप्पट जोराने सुरू होतेच. अजून शत्रूचा पुरा पाडाव झाला नव्हता. शत्रू केव्हां उचल खाईल याचा नेम नव्हता. शत्रूचा पुरा पराभव करण्याकरितां कमालपाशांनी रात्रंदिवस तयारी सुरू केली. त्यांना हत्यारे, दारूगोळा व मनुष्यबळ याची अतिशय जरूरी होती. त्यानीं फ्रान्सबरोबर गुप्त तह करून टाकल्यामुळे सिरीयाच्या सरहद्दीवरील ८० हजार लोकांची मदत व ४० हजार सैनिकांना पुरेल इतकी युद्धसामुग्री मिळाली. ,