पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/181

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाई कमालपाशा मी माझे कर्तव्य बजावीत होते, लिखाण लिहीत होते, आणि श्वासोच्छास करीत होते " + । २१ आगष्ट १९२१ रोजी प्रकांनी तुर्की सैन्यावर तोफांचा भडीमार सुरू केला. ग्रीक आणि तुर्क यांच्यामध्ये भीषण युद्ध सुरू झाले. १४ दिवस हा रणसंग्राम चालला होता. दोन्ही बाजूला प्रेतांचे ढीग पडत होते. यावेळी तुकचा पराभव झाला तर सबंध तुर्कस्थानास ग्रीकांचे गुलाम म्हणून राहणे भाग होते. कमालपाशा स्वतः रणांगणावर हजर राहून आपल्या थोड्याशा सैन्यास प्रोत्साहन देत होते. स्वातंत्र्य किंवा मृत्यु अशी गर्जना करीत ते सैनिकामधून सारखे हिंडत होते. प्रत्येक तुर्क आपले शीर तळहातावर घेऊन लढत होता. ग्रीक सैन्याने शिकस्त केली; पण तक सैन्य एक रेसभर देखील मागे हटले नाहीं. बावीस दिवसाच्या लढाई नंतर ग्रीक सैन्य थकलें व हळू हळू मागे हटू लागले. मागे हटत असतां चीडून जाऊन ग्रीक सैन्याने तुर्कीची घरेदारे व शेते जाळून टाकली. जवळ जवळ २०० मैलांचा प्रदेश त्या सैन्याने उजाड करून टाकला. कमालपाशांचे सैन्य ग्रीक सैन्याचा पाठलाग करीत होते. शेवटी ग्रीक सैन्याने आपल्या पहिल्या ठिकाणी--जेथून जुलै महिन्यांत त्यांनी चढाईस प्रारंभ केला त्याठिकाणी–खंदकांत जाऊन + ' स्त्री' मासिक, मार्च १९३५. १६६