पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/183

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गोभी कमालपाशा ।। याखेरीज कमालपाशानी रशियाकडून कर्ज काढून इटली व अमेरिकेपासून आणखी जास्त शस्त्रास्त्रे खरेदी केली. कमालपाशांनी सन १९२२ सालच्या उन्हाळ्यात ग्रीक सैन्यावर हल्ला करण्याचा बेत कायम केला; पण याची गंधवातही कुणाला लागू नये अशी त्यांनी सक्त खबरदारी घेतली, इतकेच नव्हे तर रणांगणावर असणा-या सैन्याधिका-यांना देखील या गोष्टीचा थांगपत्ता लागू दिला नाहीं. सैन्याधिका-यांशी बोलणे करावयास गेल तर शंका येईल म्हणून त्यांनी सैनिकांचा एक फुटबॉलचा सामना करण्याची आज्ञा दिली. फुटबॉलचा खेळ पाहण्याकरिता म्हणून कमालपाशा अंगोराहून मुद्दाम त्या ठिकाणी आले होते. सामना पाहण्यास सर्व लहरी अमलदार उपस्थित होते. त्यांना लढाईच्या समक्ष आज्ञा देऊन, कुणालाही संशय येऊन देता ते अंगोरास परत फिरले. हल्ला करण्यापूर्वी बरोबर एक आठवडा कमालपाशांनीं तुर्कस्थानचे बाहेरील जगाशी असलेले सर्व दळणवळण तोडून टाकले. त्यांनी २६ तारखेला म्हणजे हल्ला करण्याच्या दिवशी एक मोठी मेजवानी देण्याचे जाहीर केले व मेजवानीच आमंत्रणे २४ तारखेसच सगळीकडे पाठवून दिली. आपण फार कामांत आहोत तेव्हां आपच्या निवासस्थानाच्या आसपास दोन दिवस कुणालाही फिरकू १६५