पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/180

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गामी कमालपाशा l चालली होती. ती हॉस्पिटलच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचली तेव्हां एक सैनिकाने तिच्यावर गोळी झाडली; ती तिथेच मरण पावली. फातिमा चाऊस ही दुसरी स्त्री आपल्या वयाच्या ७० व्या वर्षी सैनिक म्हणून दाखल झाली. अमेरिकन वर्तमानपत्रांच्या बातमी दारांनी या धिप्पाड स्त्री सैनिकेचे फोटो वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध केले होते. हलिदे हनूम ( प्रसिद्ध लेखिका ) या १६ ----२१ रोजी सैन्यांत सैनिका म्हणून दाखल झाल्या. हातांत रायफल घेऊन त्या इतरांबरोबर कित्येक दिवस व रात्र खंदकांतून शत्रूवर गोळीबार करीत होत्या. त्यांच्या तुकडीला विश्रांती मिळे तेव्हां त्या जखमी शिपायांच्या शुश्रूषेची व खाण्यापिण्याची व्यवस्था करीत. त्या भयंकर दिव्यांत आपले दिवस कसे जात होते यासंबंधी त्यांनी आपल्या आठवणींत खालील उद्गार काढले आहेत, त्या क्षणापासून मला कशाचेही भान राहिले नव्हते. मी माझे वैयक्तिक अस्तित्व विसरून गेले. तुर्कस्थानांत चालू असलेल्या या प्राणांतिक राष्ट्रीय आंदोलनाचा एक घट्क म्हणून १६२