पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/178

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गा। कालपाशा केवढी धाडसाची कामगिरी केली याचे हृद्य वर्णन एका जर्मन ग्रंथकाराने पुढीलप्रमाणे केले आहे.

  • तुक तोफखान्याला लागणारा दारूगोळा। आपल्या डोक्यावर घेऊन स्त्रियांचा लांबच लांब व मोठा जमाव आघाडीवर चालला होता. त्या स्त्रियांनी आपल्या लहान लहान कच्याबच्यांना आपल्या पाठीशी घट्ट बांधून ठेविले होते. त्यांच्यामागून युद्ध सामुग्रीने भरलेल्या बैलगाड्यांची रांग चालली होती. ज्याठिकाणी युद्धास तड लागले आहे, त्या ठिकाणापासून थोड्या अंतरावर या बैलगाड्या मधून आणलेली युध्दसामुग्री स्त्रियांकडून उतरून घेतली जात असे नि तेथून प्रत्यक्ष रणांगणावर स्त्रियांकडून हातोहात पोहोचविली जात असे. तेथे पुरुषांचा तुटवडा असल्यामुळे ही सर्व कामे स्त्रियाच ।

करीत. रणांगणावर गोळीबाराचा मारा सुरू असतां व कुलपी गोळे पडत असतां, युध्दसामुग्रीचा बोजा । घेऊन तुक स्त्रिया शांतपणे व धीटपणे रणांगणावर १६०