पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/177

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाही कमालपाशा न्याहाळीली. * सक्रीया नदीच्या मार्गे ३०० किलोमिटर हटून अंगोराचे संरक्षण करण्यास सज्ज रहा असा हुकूम कमालपाशांनी सोडला व ते ताबडतोब अंगोरास परतले. आणीबाणीची वेळ पाहून, नॅशनल अँड असेंब्लीने कमालपाशांना सरसेनापती ( कमांडर इन चीफ ) च्या अधिकारासह सर्वाधिकारी ( डिक्टेटर ) नेमले. कमालपाशांनी सर्व अधिकारसूत्रे आपल्या हाती घेतली आणि शत्रूचा प्रतिकार करण्याकरितां नव्या योजना आंखन कमालपाशा ताबडतोब रणांगणावर परतले. शत्रूवर मारा करण्याकरिता जागेची पहाणी करीत कमालपाशा एका टेकडीवर उभे होते. त्यांनी लांबवर नजर टाकली. एकाएकी कमालपाशांचा चेहरा प्रफुल्लित झाला, त्यांचे डोळे कृतज्ञतेने भरून आले. तुर्की स्त्रिया आपल्या लहान लहान मुलांना पाठशी बांधून दारुगोळा आघाडीवर घेऊन जात होत्या. आपल्या आयाबहिणांचा हा उत्साह पाहून कमालपाशांनी धन्यतेचा निःश्वास टाकला व डोळ्यांतील अश्रू पुसून काढले. आजपर्यंत चार भिंतीच्या आड आपले सारे आयुष्य घालविणा-या, मुल्लामौलवींच्या टाचेखाली रगडल्या जाणा-या, रूढीच्या वरवंट्याखालीं चेचल्या जाणा-या, तुर्की स्त्रियांनी स्वातंत्रयुद्धांत १५९