पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/176

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण २० वें - - गाझी कमालपाशा s जुलै महिन्यांत कमालपाशा अंगोरामध्ये आपल्या सैन्याची पुनर्घटना करीत असतां, ग्रीक सैन्याने एकदम जोराची चढाई केली. तुर्कस्थानाच्या तीन्ही बाजूनें ग्रीक सैन्य चढाई करीत होते. त्या सैन्याला तोंड देण्याचे शिकस्तीचे प्रयत्न, जनरल इस्मतपाशा करीत होते. इस्की शहीर हे महत्वाचे लष्करी ठाणे व त्या ठाण्याचे संरक्षण करणारे तुर्की सैन्य यांना वेढून टाकण्याचा ग्रीक सैन्याचा बेत होता. ग्रीक सैन्यास थोपवून धरण्याचे इस्मतपाशांचे सर्व प्रयत्न फोल ठरले. आहे त्या ठिकाणीच ठाणे देऊन बसावयाचे किंवा मागे हटावयाचे हाच प्रश्न त्यांच्यासमोर होता. इस्मतपाशांनी ही सर्व हकीकत कमालपाशांना कळविली व त्या ठिकाणी प्रत्यक्ष येऊन पहाणी करावी असे सुचविलें. क्षणाचाही विलंब न लावतां कमालपाशा हजर झाले व त्यांनी सर्व परिस्थिती