पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/175

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकाचा हल्ला केली. त्यांना रात्रंदिवस विश्रांती नव्हती; कित्येक दिवस त्यांनी झोपेशिवाय घालविले. कमालपाशांचे सैन्य व सामुग्री दुय्यम दर्जाची होती. अव्वल दर्जाच्या ग्रीक सैन्याबरोबर मुकाबला करण्याकरिता आपले सैन्य जास्त कार्यक्षम करण्याची त्यांनी शिकस्त केली. अविश्रांत पारश्रमाचा परिणाम कमालपाशांच्या प्रकृतीवर दिसू लागला. डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याबद्दल परोपरीने बजावून सांगितले; * पण शत्रू दाराशी येऊन ठेपला असतां, विश्रांती घेणे कृतघ्नपणाचे आहे' असे करारीपणाचे उद्गार कमालपाशांनी काढले. ते पुढे म्हणाले, • माझा देश संकटांत आहे.शत्रूने माझ्या देशाची धूळधाण करून टाकण्याच्या इराद्याने चाल केली आहे. या वेळी प्रकृतकडे पाहाण्यापेक्षा माझ्या राष्ट्राकडे मला पाहिले पाहिजे. राष्ट्राच्या स्वातंत्र्याकरितां झगडत असतां मला मृत्यू आला तर त्या सारखी भाग्याची दुसरी गोष्ट नाहीं असें मी समजेन. आता विश्रांती राष्ट्राला स्वतंत्र केल्यानंतर; किंवा मेल्यानंतरच ! " । , -- ...


| । । ।। । १५७