पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/174

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाझी कमालपाशा प्रेरणेनेच ग्रीक सैन्य तुकचा पराभव करण्याकरितां सज्ज झाले होते. फ्रान्स आणि इटली येथील राजकर्त्यांच्या मनांत में तुर्की-ग्रीक युद्ध संपवून टाकावे असे होते. कदाचित या क्षुल्लक वाटणाच्या युद्धापासून पुनः सर्व जग पेट घेईल अशी त्या राज्यकर्त्यांना भीती वाटत होती. त्यांनी तुर्कस्थान व ग्रीस यामध्ये सलोखा निर्माण करण्याची तयारीही दर्शविली;पण ग्रीसने या गोष्टीचा सक्त इन्कार केला. १५ आम्हीं शेवटपर्यंत लढणार' असे ग्रीक मुत्सद्यांनी दोस्तराष्ट्रांना कळविले. यावर दोस्तराष्ट्रांनी ५ तुमचे तुम्हीं पाहून घ्या, आम्हीं तटस्थ राहतो " असे जाहीर केले. आता हा लढा फक्त तुर्कस्थान व ग्रीस यामध्येच चालू राहिला. फ्रान्सने तुर्कस्थानाला मदत करण्याचे गुप्त संदेश पाठविले. इटालीने तर तुर्कस्थानाला उघडपणे हत्यारे पुरविण्यास सुरवात केली. अफगाणिस्थान, पर्शिया, हिंदुस्थान आणि इजिप्त या देशांत तुर्कस्थानाला मदत करण्याची चळवळ सुरू झाली. सगळीकडून तुर्कस्थानावर सहानुभूतीचा व आर्थिक मदतीचा वर्षाव होऊ लागला. याखेरीज तुर्कस्थानांमधील यादवी नष्ट झाल्या कारणाने, तुर्कस्थान पूर्वीपेक्षा जास्त बलवान व कार्यक्षम झाला. आता जास्त वेळ दवडण्यात अर्थ नाही असे समजून कमाल पाशांनीं ग्रीक सैन्याचा प्रतिकार करण्यासाठी जय्यत तयारी सुरू १५६