पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/171

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीकांचा हल्ला कमालपाशांचा हा तेजस्वी संदेश विद्युत्वेगाने राष्ट्रभर पसरला. क्षणत तुकीचा निराशावाद निघून गेला व नव्या दम्याने त्यांनी ग्रीक सैन्यास तोंड देण्याचा निर्धार केला. तुर्की स्त्रियांमध्ये तर । उत्साहाचे वारे पसरले. आपला बुरखा फेकून देऊन त्या स्वातंत्र्ययुध्दास सज्ज झाल्या.. दुसरे दिवशीं कमालपाशा पुन्हां रणभूमीवर परतले. मा-याची जागा पहात, कमालपाशा घोड्यावरून फिरत होते.घोडा वळवितांना दगडावरून घोड्याचा पाय निसरला व तोल जाऊन घोडा खाली पडल्यामुळे कमालपाशांच्या बरगडींत भयंकर मार लागला; त्यांना हणे देखील अशक्य होऊन गेले. कमालपाशांची बरगडी तुटली असून त्यांना उपचाराकरितां अंगोन्यास नेले अशी बातमी क्षणांत । सैनिकांमध्ये पसरली. कमालपाशांना, आपल्या मुख्य सैन्याधिका-याला अपघात आणि तोही लढाईस तोंड लागण्यापूर्वी ! सैनिकांना धक्का बसला; त्यांचे चेहरे सुकून गेले. सुरवातीसच अमंगल प्रसंग घडला. लढाईला जोरात सुरवात झाली. ग्रीक सैन्याने तुकची दक्षिण आधाडीची फळी फोडली. ही फळी फोडण्यांत तुकचे अंगोत्याशी असलेले दळणवळ तोडून टाकण्याचा उद्देश होता. १५३