पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/172

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाशी कमालपाशा तुर्क जीवावर उदार होऊन लढू लागले. तेथील रखरखीत माती रक्ताने भिजू लागली. तोफांच्या गोळ्यांनी बाजूच्या टेकड्यांच्या ठिकन्या उडू लागल्या. ग्रीक सैन्याने तुर्कीना मागे रेठले. तुर्कोचा दम तुटू लागला. आपलें सैन्य कच खात आहे अशी बातमी ऐकल्याबरोबर कमालपाशा ऑपरेशन टेबलावर ताडकन उठून बसले. डॉक्टरांनी त्यांना न हलण्याबद्दल परोपरीने सांगितले; पण त्यांनी डॉक्टरांच्या म्हणण्याकडे लक्ष्य दिले नाही. शेवटी डॉक्टरांनी बँडेज कसेबसे बांधयानंतर कमालपाशा रणांगणाकडे निघाले. त्यांची एक बरगडा फुप्फुसांत घुसल्यामुळे त्यांना मरणप्राय वेदना होत होत्या; तरी त्याची पर्वा न करितां ते आघाडीवर पोहचले. | कमालपाशांच्या आगमनाची बातमी खंदकाखंदकांतून वायुवेगाने पसरली. सैनिक साशंक झाले, इतका भयंकर मार लागला असता पुन्हां रणांगणावर कमालपाशा आले आणि तेही इतक्या लवकर ? अगदीच अशक्य? कदाचित् आमचा उत्साह द्विगुणीत व्हावा ह्मणून ही हूल उठविली असेल! " पण ही फूल नव्हती. खरोखरीच कमालपाशा आघाडीवर हजर झाले. त्यांना पाहातांच सैनिकांनी जयजयकार केला. कमालपाशा मोठ्या मुष्कीलीने घोड्यावरून फिरत होते. ते सैनिकांना म्हणाले, ६ माझ्या शूर वरान ! हा १५४