पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/170

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाली कमालपाशा त्यांच्या मान्यापुढे माघार घेऊन तुर्कस्थानाच्या उज्वळ परंपरस काळीमा फासणार काय? आज तुम्हीं शत्रूपुढे हार खाल्लीत, माघार घेतलीत तर या जगांमधील तुमचे अस्तित्व तुमचा पराक्रम, तुमचा मोठेपणा, तुमची संस्कृती यांना कायमची मूठमाती मिळाली म्हणून समजा. तर्काचे नांव जिवंत ठेवणे सर्वस्वी तुमच्या हाती आहे. तुम्हीं, सर्वांनी हातपाय गाळले, तरी कमाल एकटा लढेल. शत्रूने राईराई एवढे तुकडे केले तरी मातृभूमी त्याला प्रेमाने आपल्या पदराखाली झांकून घेईल! आणि ती म्हणेल --- कमालपाशा माझ्या पोटी जन्मला होता, कमाल माझ्या दुधाने वाढला होता, कमालच्या अंगांत माझ रक्त खेळत होते, म्हणून तो माझ्यासाठी लढला-माझ्यासाठी मला. जातिवंत कवी म्हणतलि कमाल मेला पण आईसाठीं मेला ! कमाल जिंवत होता. कमाल मुदाड नव्हता! मग बोला तह करणार कां लढणार ? लढता लढतां मरणार ? ' * ८८ आम्ही लढणार! आम्हीं लडणार ! ” एकच आरोळा ऐकू आली.

  • तर मग उठा, सज्ज व्हा, एकनिष्ठतेने लढा, विजय तुमचाच आहे! "
  • सामत् कृत ' कमालपाशा' पृष्ट ५६-५७

१५३