पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/167

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

। प्रीकांचा हल्ला, “मूठभर आणि अडाणी तुर्कीनीं महायुद्धांत विजय मिळविलेल्या दोस्तराष्ट्रांच्या सैन्यास मेंढरांसारखे पिटाळून लावावे म्हणजे केवढा हा अपमान ! आणि हा अपमान आमच्या जागत्या डोळ्यांनी पाहावयाचा ! ते कांहीं नाहीं. याला जर पायबंद घातला नाही तर उद्यां ठिकठिकाणीं क्रांत्या होतील, बंडखोरांचा सुळसुळाट होईल, आणि आम्हीं जी जगाची आखणी आमच्या मनाप्रमाणे केली आहे तिची धुळधाण उडेल. वाटेल ते झाले तरी या तरुण तुर्कीना वठणीवर आणलेच पाहिजे ! होय; पण ते कसे ?" | पुनः ते मुत्सद्दी निराशपूर्ण नजरेने एकमेकांकडे पाहू लागले. त्याचवेळी त्यांच्यामागे एक धूर्त व्यक्ति, या मुत्सद्यांचे मनोगत ओळखीत उभी होती; त्यांच्या चेह-यावर उमटलेल्या भावना काळजीपूर्वक न्याहाळीत होती. या व्यक्तीचे नांव व्हेनिझिलॉस होते. व्हेनिझिलॉस हा ग्रीसचा मुख्य प्रधान होता. अतिशय हुशार व महत्वाकांक्षी मुत्सद्दी अशी त्याची ख्याति होती. त्याने आपल्या आयुष्यात एकच ध्येय समोर ठेविले होते आणि ते म्हणजे तुर्कस्थान काबीज करून, ग्रीसचे एक मोठे साम्राज्य स्थापावयाचे नि कॉन्स्टॅटिनोपल ही त्या साम्राज्याची राजधानी करावयाची ! सतत २० वर्षे तो आपल्या ध्येयामागे लागला होता. ५४९