पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/166

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गासी कमालपाशा बातमी लागतांच ते अवस्थ झाले. प्रत्येक राष्ट्राने तुर्कस्थानामधील आपलें सैन्य कमी करून टाकले होते; त्यामुळे तुर्कीना पायबंद कसा घालावा याची त्या मुत्सद्यांना फार काळजी लागला. याशिवाय दोस्त राष्ट्रांमध्ये युद्धानंतरची भीषण प्रतिक्रिया सुरू झाली होती. इटालीमध्ये क्रांति होण्याची चिन्हें स्पष्टपणे दिसत होती, फ्रान्सचे हात सिरीयामधे गुंतले होते, ब्रिटिश साम्राज्य युद्धाच्या जबरदस्त टोल्यामुळे हतबल झाले होते, आयर्लंडमध्ये यादवी सुरू झाली होती, मेसापोटेमिया व हिंदुस्थानमध्ये स्वातंत्र्याची चळवळ जोरात सुरू होती. अमेरिकेने तर मदत करण्याचें साफ नाकारलं ! यामुळे. तुकचा बीमोड करून आपला डाव साधण्याकरिता दोस्तांजवळ भरपूर सैन्य नव्हते. आहे त्या परिस्थितींत तुकौशी लढणे किंवा पळून जाणे एवढे दोनच उपाय त्यांच्या समोर होते. पॅरिसमध्यें तहाच्या वाटाघाटी करीत बसलेल्या मुत्सद्यांनी आपली डोकीं खाजविली; पण त्यांना कांहीं मार्ग सुचेना. * कमालपाशा नुसते आक्रमण करूनच थांबणार नाहीत तर दोस्तराष्ट्रांच्या उरलेसुरलेल्या सैन्याची लांडगेतोड करून त्यांना तुर्कस्थानामधून अपमानास्पद रीतीने हाकलून लावणार,' हे ताजे वृत्त ऐकतांच ते आ वांसून बसले. १४८