पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/168

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

माझी मालपाशा तें ध्येय साध्य होण्याची वेळ आतां आली असे त्याला वाटू लागलें. त्याने नुक्तेच स्मनीमध्ये पहिल्या दर्जाचे शीक सैन्य पाठवून दिले होते. इंग्लीश आणि फ्रेंच सरकारांकडून युद्धाचा मोठा सांठा त्याने अगोदरच विकत घेतला होता. उत्कृष्ट बंदुका, तोफा, रणगाडे यांनी ग्रीक सैन्य सुसज्ज केले होते, • तुर्कस्थानचा बराच मोठा व सुपीक प्रदेश ग्रीसच्या हवाली करण्यास तुम्हीं तयार असाल तर मी आपले उत्कृष्ट सैन्य तुमच्या दिमतीस देतो. अशी समोर बसलेल्या मुत्सद्यांस व्हेनिझिलॉसने अट घातली. त्या मुत्सद्यांना ताबडतोब ती अट कबूल घेली व ग्रीक सैन्य आघाडीवर पाठवून आपली अब्रू वाचविण्याचा त्याला आग्रह केला, व्हेनिझिलास एकवेळ हांसला व त्या मुत्सद्यांच्या इच्छेप्रमाणे ताबडतोब चढाईचा हुकूम देण्याचे त्याने कबूल केलें. कमालपाशा व त्यांचे सहकारी यांनी कॉन्स्टॅटिनोपलवर हल्ला करण्याची जय्यत तयारी केली; तोच ग्रीक सैन्य आघाडीवर येत आहे असे त्यांना कळलें. जसजसे ग्रीक सैन्य पुढे सरकत गेल, तसतसा त्या सैन्यास विजय मिळत गेला. खरे पाहिले असता, सुसज्ज अशा ग्रीक सैन्यापुढे कमालपाशांचे सैन्य म्हणजे कांहीच १५० - -

-