पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/165

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीकांचा हल्ला मुत्सद्दी म्हणून कमालपाशांची कीर्ति पसरू लागली. आपल्या राष्ट्राचा उद्धार फक्त कमालपाशा एकटेच करू शकतील अशी जनतेची खात्री झाली. त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या राष्ट्रावर चाल करून येणा-या प्रकांचे पारिपत्य करण्याचा तुकांनी निश्चय केला. कि सैन्याचे पारिपत्य करण्याकरितां कमालपाशांनी ताबडतोब युद्धमंडळ नेमलें व त्यांत बेकरिसामी, जाफर, फिवझी या पराक्रमी पुरुषांचा समावेश केला. दक्षिणभागांतील तुर्कीनीं कमालपाशांच्या आज्ञेप्रमाणे फ्रेंच सैनिकांवर हल्ला करून त्यांना पिटाळून लावले. पूर्व भागाकडे कझाकारा बेकर यांनी शत्रूला हाकलून देऊन तो प्रदेश सुरक्षित केला. कमालपाशांनी कॉन्स्टेंटिनोपलवर चाल केली.स्मनाच्या बाजूस ग्रीक सैन्य व कॉन्स्टॅटिनोपल मध्ये इंग्रजसैन्य, इतकेंच परकियांचे सैन्य सबंध तुर्कस्थानामध्ये होते. जनरल जाफर यांनी युरोपच्या बाजूने व अली फऊद यांनी आशियाचे बाजूनें कॉन्स्टॅटिनोपलवर कमालपाशांच्या मदतीला मोर्चा नेला. कॉन्स्टॉटनोपलमध्यें इंग्लिश सैन्य अगदीच थोडे असल्यामुळे तुकचा प्रतिकार करण्यास ते सर्वस्वी असमर्थ होते. दोस्तराष्ट्रांच्या महान मुत्सद्यांना तुकच्या आक्रमणाची १४७