पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/164

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाशी कगालपाशा | सुलतान वहीदुद्दीन, मुख्य मंत्री फरीदपाशा व सुलतानांचे मंत्रिमंडळ यांजमध्यें वाटाघाट चालू होती. तह कितीही अपमानकारक असला तरी तो मान्य केला पाहिजे, असा मुख्य मंत्री फरीदपाशा यांचा आग्रह पडला. शेवटीं सुलतानांनी संमत्ती दिली व तुर्की वकिलांनी परिसमध्ये जाऊन तारीख ११ आगष्ट १९२० रोजी तहावर सह्या ठोकल्या. तो दुदैवी दिवस तुर्कस्थानांमध्ये सुतकासारखा पाळला गेला. वर्तमानपत्रांतील मजकूर काळ्या चौकटींत प्रसिद्ध झाला. हताश नि निराश झालेले तुर्क कमालपाशांकडे मोठ्या आशेने पाहू लागले. प्रत्येक सुर्क कमालपाशांच्या निशाणाखालीं भराभर जमू लागला. उरले सुरलेले खलीफांचे सैन्य कमालपाशांना मिळाले; आणि अशा रितीने तुर्कस्थानाची प्रतिकारशक्ति वाढू लागली. जवळजवळ ५०० वर्षे तुर्कलोक राज्यकर्ते होते; आतां गुलाम होऊन राहण्याचा दुर्धर प्रसंग त्यांच्यावर गुदरला होता. या तहामुळे तुकीमधील आपापसांत असणारे सारे भेद चदिशीं नाहीस झाले. कमालपाशांनी केलेल्या भीषण भविष्याची त्यांना प्रचीती आली. त्यांनी जे शब्द बोलून दाखविले होते ते अक्षरशः खरे ठरू झागले. निव्वळ योद्धा म्हणून नव्हे तर अव्वल दर्जाचा ३४ "