पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/163

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ग्रीकांचा हल्ला इ हक्क सोडावयाचा; दक्षिण अनातोलिया व किलीकीया हे प्रांत फ्रान्सला, व अदालिया हो इटलीला व स्मन ग्रीसला द्यावयाचा; कॉन्स्टॉटनोपल ही तुर्कस्थानची राजधानी आंतरराष्ट्रीय नियंत्रणाखाली असावयाची; फक्त मध्य अनातोलीया तेवढा तुकच्या ताब्यात राहावयाचा; तुर्कीच्या प्रत्येक हालचालीवर दोस्तराष्ट्रांची नजर असावयाची; त्यांच्या जमीनमहसुलावर नियंत्रण ठेवले जावयाचे; तुर्की फौजा कमी करावयाच्या आणि ग्रीसखेरीज करून इतर राष्ट्रांच्या नुकसान भरपाईकारितां त्यांना तुर्कस्थानाने १८ कोट रुपये द्यावयाचे; अशा अटी घालून युरोपियन मुत्सद्यांनी तुर्कस्थानाची गठडी वळली होती. या तहाच्या अटी प्रसिद्ध झाल्याबरोवर मुसलमानों जगतात भयंकर खळबळ उडाली. युरोपमधील एकुलत्या एक मुसलमानी राष्ट्राची युरोपियन मुत्सद्यांनी धुळधाण उडविलेली पाहून प्रत्येक मुसलमानाचे अंतःकरण दुखावले गेले. तुर्कस्थानामध्ये तर हाहा:कार उडाला; राष्ट्राच्या कानाकोप-यांतून निषेधाच्या गर्जना होऊ लागल्या; जनता संतापाने बेभान झाली; या अपमानास्पद तहावर सही करण्यास सुलतानांनी संमत्ती देऊ नये, अशा आरोळ्या सर्वत्र ऐकू येऊ लागल्या. १४५