पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/162

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण १९ वें - - ग्रीकांचा हल्ला, ६. १० महायुध्द संपल्यानंतर परिसमध्ये प्रेसिडेंट विल्सन,लाईड जॉर्ज कॅमेको आदि बडी बडी मुत्सद्दी मंडळी पराजित झालेश्या राष्ट्रांचे भवितव्य ठरविण्याकरितां जमली. तुककरितां एक तहनामा तयार करण्यात आला. हा तहनाम्याचे नांव सेव्हर्सचा तह होय. या तहाच्या अटीही ताबडतोब जाहीर करण्यांत आल्या. त्या तहाच्या अटीचा स्वीकार म्हणजे तुर्कस्थानचा मृत्यूच होता.

    • युरोपमधुन तुकची कायमची उचलबांगडी

करणे हाच सेव्हर्सच्या तहाचा उद्देश होता.* " या तहान्वयें तुर्कस्थानाने सीरिया पॅलेस्टाईन, इराक, हेजाज अरबस्थान, इजिप्त, सुदान, लिबिया व सैप्रस यावरील अधिराज्याचा *• The New world "by Bowman, Ph.D.-Page 402