पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/161

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अँड नॅशनल असेंब्ली कृतनिश्चय केला आहे. योग्य व सन्मानयीय असा शांततेचा तह । करण्यास, तुर्की राष्ट्राची केव्हाही तयारी आहे. मात्र तो तह राष्ट्राच्या खास प्रतिनिधीकडूनच केला जाईल. महायुद्धांत जर्जर झालेल्या, यादरीने कमजोर व निःसत्व बनलेल्या व अद्यापि शत्रूच्या कबजांत असलेल्या एका राष्ट्राच्या तात्पुरत्या अध्यक्षांचे हे बेडरपणाचे उद्गार, कमालपाशांच्या अभिजात निधडेपणाची उत्कृष्टपणे साक्ष देत आहेत. या निधडेपणाचा जन्म स्वाभिमानांत झाला होता. कमालपाशांच्या स्वाभिमानावर कुणी हल्ला केला तर कशाचीही पर्वा न करता ते त्यांच्यावर तुटून पडत. एकदां लॉड ग्रे यांनी आपल्या भाषणांत तुर्कीना कमीपणा येईल असे उद्गार काढल्याचे ऐकतांच ते उसळून म्हणाले 4 आह्मीं त्यांच्याच योग्यतेचे आहात हे इंग्रजांना लवकरच कळेल आणि आम्हांला बरोबरीने वागविणे त्यांना भाग पडेल. प्राण गेला तरी आम्ही आमची मस्तकें त्यांच्यासमोर झुकविणार नाहीं. आमचा शेवटचा मनुष्य जिवंत असेपर्यंत त्यांच्याशी आह्मीं झगडत राहून आमचे म्हणणे त्यांना कबूल करावयास लावू ! ” १४३