पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/158

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गामी कला मृत्यू !' या कमालपाशांच्या घोषणेचा पुनरुच्चार करीत, हजारों तुर्क त्यांच्या निशाणाखाली जमू लागले. यशोदेवता कमालपाशांच्या सहाय्यास धांवलीं-कमालपाशांच्या असंख्य अनुयायांनी कांचा यशस्वी प्रतिकार केला, सुलतानांच्या कच्छपी लागलेल्या राजनिष्ठांच सुखद उडविला, कमालपाशांच्या विरुद्ध प्रचार करणाच्या मुल्लामौलवींना तोबा करावयास लावले. त्यांच्या अनुयायांमधे इतका उत्साह, इतके धैर्य निर्माण झाले की, त्यांनी इंग्लीश पलटणींवर हल्ला करून त्यांना समुद्रापर्यंत पिटाळून लावले; फ्रेंच व इटालीयन सैन्याची तीच गत केली. राष्ट्रावर नियंत्रण ठेवण्याकारतां दोस्तराष्ट्रांनी जे अधिकारी ठेविले होते त्यांना कैद करून, इंग्लीशांनी ज्या तुर्कीपुढा-यांना माल्टामध्ये कैदेत टाकले होते त्यांच्याबद्दल ओलीस म्हणून ठेवून घेतले.

  • इंग्रजांनी आपल्या राजधानीचा कबजा घेतला, आपल्या पुढा-यांची धरपकड करून त्यांना तुरुंगात डांबले, तुर्की पालमट बरखास्त करण्याचा उद्दामपणा केला आणि या सर्व अपमानकारक कृत्यांना सुलतानाने संमत्ती दिली. या बातम्या खेडोपाडी पोहोचल्यावर तुर्की जनता सुलतानावर फार खवळली. * आपण आपल्या सध्या देशबांधवांविरुद्ध व कमालपाशांवरुद्ध अधपणाने

३४७