पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/159

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अँड नॅशनल असेंब्ली सुलतानाला मदत केली हा आपला मुर्खपणा झाला,' असे जनतेला वाटू लागले. कमालपाशांच्या राष्ट्रीय पक्षास राष्ट्राच्या कानाकोप-यांतून जोराचा पाठिंबा मिळू लागला. जोपर्यंत कॉन्स्टॉटनोपलमध्ये आपल्या राजधानमिध्ये, इंग्रजांचे वर्चस्व आहे तोपर्यंत आपणास कांहीही करता यावयाचे नाही, असे प्रत्येक तुर्काचे ठाम मत । बनले. राष्ट्रांच्या अभ्युदयाकरितां सुलतानांवर विश्वास टाकणे कुचकामाचे आहे अशी त्यांची विचारसरणी बनू लागली. कमालपाशांची बाजूच न्यायाची व योग्य आहे; परकीयांच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेण्याकरितां संशज प्रतिकार केला पाहिजे असे विचारप्रवाह सर्व राष्ट्रभर जोरात वाहू लागले. सर्व दर्जाच्या, मताच्या आणि पक्षाच्या स्त्री- पुरुषांनी राष्ट्राच्या उध्दाराचे कंकण हातीं बांधलें.खेडुत स्त्रियांनी दारूगोळा नि हत्यारे गोळा करण्याची तयारी दर्शविली, घरंदाज स्त्रियांनी सैनिकांची शुश्रुषा करण्याचे व त्यांचे कपडे शिवण्याचे कार्य पत्करलें. एकजात सर्व तुर्कीनी कमालपाशांच्या आज्ञा एकनिष्ठपणे पाळण्याच्या प्रतिज्ञा केल्या. खलीफांच्या सैन्यावरही या वातावरणाचा परिणाम झाला. त्या सैन्यांत सीनकांची गळती सुरू झाली.