पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/157

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अँड नॅशनल असेंब्ली चर्चा करीत व राष्ट्राच्या कानाकोप-यात काय चालले आहे याचा कानोसा घेऊन त्याप्रमाणे आपल्या सैनिकांस हुकूम देत. त्यांच्या सैनिकांच्या हाती जे मुल्लामौलवी व सुलतानांची कड घेणारे लोक सांपडतील, त्यांना यमसदनास पाठविण्याची त्यांनी सर्रास परवानगी दिली होती. इतके प्रयत्न करूनही जर राष्ट्रप्रेमी तुकची खटपट फुकट जाईल तर तुम्ही काय कराल? असा प्रश्न एका अभकिन वार्ताहराने कमालपाशांना विचारला. तेव्हां कमालपाशांनीं निश्चयी आवाजांत उत्तर दिले, १५ जे राष्ट्र आपच्या अस्तित्वाकरितां व स्वातंत्र्याकरिता त्यागाची शिकस्त करते, त्या राष्ट्राचा कधीच पराभव होणार नाहीं. पराभव ह्मणजे राष्ट्राचा मृत्यू होय. आपले राष्ट्र मेलें नाहीं, अद्याप ते जिवंत आहे, असा त्यांचा विश्वास होता. कमालपाशांच्या रोमरोमांतून, नसानसांतून, शब्दाशब्दांतून हा विश्वास प्रतीत होत होता. कमालपाशांनी आपल्या अमोघ वाणीने राष्ट्रप्रेमी तुकीमध्ये नवचेतना निर्माण केली. त्यांच्या प्रभावी वक्तृत्वाने तरुण तुकीच्या अंतःकरणाचा ठाव घेतला.कमालपाशांचे जळजळीत विचार, त्यांची मातृदेशाविषयीं असीम तळमळ,राष्ट्राच्या उद्धाराकरिता त्यांचे चाललेले अविश्रांत प्रयत्न पाहून प्रत्येक तुर्क कमालपाशांवर आपको जान कुर्बान करू लागला. स्वातंत्र्य किंवा १३९