पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/156

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गझी कमालपाशा दंगल सुरू केली. इधम नांवाच्या त्यांच्या पुढा-याने तर, ' आपण तुर्कस्थानचे बादशहा आहत.' असे घोषित केले. कमालपाशांपुढे भेसूर निराशेचे चित्र उभे राहिले. आपण आतांपर्यंत राष्ट्राच्या उद्धाराकरितां केलेले परिश्रम वायां जाऊन, आपलं राष्ट्र गुलाम म्हणून कायमचे दिवस कंठणार या विचाराने त्यांच्या अंतःकरणांत कालवाकालव सुरू झाली. त्यावेळी बाहेर काळकभिन्न अधार पसरला होता. कमालपाशांनी खिडकीतून बाहेर नजर टाकली तोच त्या अंध:काराच्या भालप्रदेशावर उठून दिसणारी चंद्रकोर त्यांच्या दृष्टीस पडली. कमालपाशांचा चेहरा बदलला,त्यांच्या डोळ्यामध्ये एक प्रकारचे तेज चमकू लागले,त्यांचे बाहू स्फुरण पाऊ लागले! त्यांनी आपल्या मुठी आवळल्या व ते ताडकन उठून उभे राहिले. 4 शरीरात रक्ताचा थेंब शिल्लक असेपर्यंत मी लढत राहणार. माझ्या मातृदेशाला मी अद्यापही स्वतंत्र करू शकेन. कमालपाशांच्या या उद्गारांनी त्यांच्याभोवती असणाच्या अनुयायांमध्ये विद्युत्वेगाने उत्साह पसरला. आपल्या प्रकृतीची पर्वा न करितां कमालपाशा रात्रंदिवस त्या दिवाणखान्यांत बसून सद्यस्थितीवर आपल्या सहका-यांबरोबर १३८