पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/155

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अँड नॅशनल असेंब्ली ऐकून देखील आपल्या मनावर काडीमात्र परिणाम न होऊ देणा-या कमालपाशांच्या चेह-यावर विषण्णता कां पसरावी ? त्यांना अस्वस्थता कां वाटावी? त्यांनी बेचैन कां व्हावे ? ग्रीक लोकांनी स्मनच्या बाजूने पुन्हां तुर्कस्थानावर आक्रमण र आक्रमण सुरू केल्याची बातमी ऐकून कमालपाशांना फार धक्का बसला. यादवीने जर्जर झालेल्या तुर्कस्थानावर झडप घालून त्याला नेस्तनाबूद करण्याची सुसंधी ग्रीक लोकांनी साधल्याचे ऐकून कमालपाशा अत्यंत अस्वस्थ झाले. ग्रीक सैन्याच्या अत्याचारांमुळे स्मनच्या बाजूस हाहाःकार उडाला होता. सांपडतील त्या तुकीची निर्दयपणे कत्तल करीत, तुकची घरेदारे जाळीत, त्यांची शेते उजाड करीत कि सैन्य पुढे सरकत होते. आपल्या शत्रूला विरोध करावयाचा सोडून, आपल्याच लोकांच्या पाठीस हात धुवून लागलेल्या मुल्लामौलवींची व त्यांना आश्रय देणाच्या सुलतानांची कमालपाशांना अत्यंत चड आली. मुल्लामौलवींनी भडकाविलेला वणवा सर्व राष्ट्रभर वायुवेगाने पसरू लागला. जिकडे पहावे तिकडे तरूण व राष्ट्राभिमानी तुकाची लांडगेतोड सुरू झाली. * खलीफांच्या सैन्याने, शहरामागून शहरे आपल्या कबजांत घेऊन तेथील तरूण तुकचा नि:पात करण्यास सुरवात केली. स्मनच्या दुन्याखान्यांतील रानटी टोळ्यांनीही ठिकठिकाणी १३७