पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/152

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाशी कमालपाशा, विरुद्ध युद्ध म्हणजे इस्लामावरुद्ध युद्ध होय. या धर्महीन तरूण तुकना नेस्तनाबूद करून टाका, ते सांपडतील त्या ठिकाणी ठेचून काढा. त्यांचा नि:पात केल्याशिवाय इस्लाम धर्माची व खलीफाची शाश्वती नाही. त्यांना मारून टाकणे म्हणजे महापुण्य पदरी बांधून घेणे होय, हे तरूण तुर्क इस्लामचे कट्टे दुष्मन होत " अशा त-हेचा विषारी प्रचार या मुल्लामौलवींनी समाजांत सुरू केला. बहुसंख्यांक तुर्की समाज अडाणी व धमध असल्यामुळे या प्रचाराचे भीषण पारणाम सबंध तुर्कस्थानभर दृगोचर होऊ लागले. तरुण तुर्कीमध्यें व मुल्लामौलवनी चिथावून दिलेल्या अज्ञानी तुर्कमध्ये भयंकर यादवी सुरू झाली. शहराशहरामध्ये, खेड्याखेड्यांमध्ये, कुटुंबाकुटुंबामध्ये दोन तट पडून रक्तपात होऊ लागला. बापाविरुद्ध मुलगा, भावाविरुद्ध भाऊ, सामाविरुद्ध भाचा, चुलत्याविरुद्ध पुतयः, एकमेकांवर तुटून पडू लागल, ठिकठिकाणीं बंड व दंगे सुखं झाले; त्या दंग्यांस सुलतानांच्या लोकांनी प्रोत्साहन दिले.एकमेकांवर दगडांचा वर्षाव होऊ लागला, लाठीमार सुरू झाला, अंगावर फटक्यांचे वळ उठू लागले, तलवारीचे घाव पडू लागले, ठिकठिकाणी फांसावर लटकावलेली प्रेत दिसू लागली. कमाल पाशांच्या अनुयायांनी यांचा पुरेपूर सूड घेतला. सुलतानांचे लोक, १३४