पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/151

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रिपाची माझी या नांवाची एक तात्पुरती फौज तयार करावयास युद्धमंत्री सुलेमानपाशा यांना फर्माविले. सदर फौज तयार करण्याकरितां । सुलतानांनी इंग्रजांची परवानगी घेतली होती. या कार्यास हातभार लावण्याकरितां सुलतानांनी तुर्कस्थानमध्ये असणा-या झाडून साच्या मुल्लामौलवींना पाचारण केले. जवळ जवळ दोन तपे तरूण तुर्कीचे सर्वत्र वर्चस्व असल्यामुळे या मुल्लामौलवींची मिजास बंद पडली होती, त्यांना कोणी विचारीनासे झाले होते, त्यांची अवहेलना होत होती. सुशिक्षित तुकचा उत्कर्ष होण्यापूर्वी तुर्कस्थानमध्ये यो मुल्लामौलवींचे अतिशय प्ररथ होते हैं आपण मार्गे पाहिलेच आहे. तरूण तुकांनी त्यांचे प्रस्थ कमी करण्यांत प्रथम भाग घेतला; त्यांचे समाजांतील महत्वाचे स्थान हिरावून घेतले; त्यांच्या धर्माज्ञा धाब्यावर बसविल्या. तेव्हां या तरुणांचा नि:पात करण्याची सुसंधी मुल्लामौलवी कशी गमावतील? ते मोठ्या हिरीरीने सुलतानास जाऊन मिळाले. स्वातंत्र्याकरितां तळमळणाच्या तुर्कीविरुद्ध गिल्ला मानविण्याची महत्तम कामगिरी सुलतानांनी त्यांच्यावर सोपविली. सुलतानांचा आशिर्वाद घेऊन ही सैतानांची सेना सबंध तुर्कस्थानांत पसरली : पाश्चात्य ज्ञान घेतलेल्या या तरुण तुकचे ऐकू नका. त्यांनी अखिल मुसलमानांच्या खलिफा विरुद्ध युद्ध पुकारले आहे. खलीफा म्हणजे जगांवील मुसलमानांचा धर्मगुरू, खफिच्या ያንን