पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/150

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाझी कमालपाशी आपल्या हुकमतीखाली असणाच्या तुर्की राष्ट्राच्या पार्लमेंटनें स्वतंत्र राष्ट्राची मागणी करणारा करार मंजूर करून घ्यावा ही गोष्ट इंग्रजांना फार झोंबली. त्यामध्येच तरुण तुर्कीनी ठिकठिकाणी आपल्याविरुद्ध बंड केल्याच्या वार्ता त्यांच्या कानावर आल्या. दिलेल्या हुकमांचा भंग सर्रास सुरू आहे, नियंत्रण करण्याकरिता ठविलेल्या इंग्रज अधिका-यांचा पदोपदी अपमान होत आहे, हत्यारे हवाली करण्यांत तरुण तुर्कीकडून इन्कार होत आहे, इंग्रज लोकांच्या छावण्यांवर हल्ले होत आहेत,अशा अनेक बातम्या सारख्या येऊ लागल्यामुळे इंग्रजांचे स्वास्थ्य पार नष्ट होऊन गेले.तुर्कस्थानच्या अंतर्भागांतून इंग्रज सैन्य निघून गेल्यामुळे, या गोष्टींचा बंदोबस्त करणे इंग्रजांना अवघड जाऊ लागले. फक्त कॉन्स्टॅटिनेपलमध्ये तेवढे त्यांचे सैन्य असल्यामुळे त्या ठिकाणीच तरुण तुर्कीच्या आकांक्षाना शक्य तितका पायबंद घालण्याचे त्यांनी योजिले. मार्च ता. १६ ला इंग्रजांनीं सबंध शहर आपल्या ताब्यात घेऊन,सुलतानास पार्लमेंटची बैठक बरखास्त करावयास लाविली नि पार्लमेंटच्या सभासदापैकी ब-याच पुढा-यांना कैद करून त्यांना माल्टामध्ये पाठविले. कांहीं तुर्की पुढारी मात्र इंग्रजांच्या हातून निसटून गेले. या सुसंधीचा फायदा घेऊन तरुण तुकचा कायमचा बीमोड करावयाचे सुलतानांनी ठरविले. त्यांनी 4 खलीफाचे सैन्य " ११